Home अमरावती कर्मयोगी गाडगेबाबा कृतिशील संत तर भाऊसाहेब कृतिशील शिक्षणतज्ज्ञ- प्रा.अरुण बुंदेले

कर्मयोगी गाडगेबाबा कृतिशील संत तर भाऊसाहेब कृतिशील शिक्षणतज्ज्ञ- प्रा.अरुण बुंदेले

169

▪️कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवारातर्फे प्रा.बुंदेले यांचे “संत गाडगेबाबा व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची गरज” या विषयावर व्याख्यान संपन्न.

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.27डिसेंबर):-  ” कर्मयोगी संत गाडगेबाबा व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे संबंध समान ध्येयाने प्रेरित झालेले होते.त्यांच्यात विचारांची एकरूपता होती. एकच ध्येय होते ते म्हणजे बहुजन समाजाचा उद्धार,शिक्षण प्रसार,अंधश्रद्धा व अस्पृश्यता निर्मूलन व या विचारामुळेच हे दोघेही महापुरुष एकत्र आले.संत गाडगेबाबांनी लोकवर्गणी करून भाऊसाहेबांना शैक्षणिक कार्यासाठी फार मोठी मदत केली.गाडगेबाबांनी सुरू केलेल्या अनेक कार्यात भाऊसाहेबांनी प्रशासकीय व कायदेशीर पाठबळ दिले.गाडगेबाबा हे कृतिशील संत तर भाऊसाहेब हे कृतिशील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या विचारांची आज समाजाला फार मोठी गरज आहे. ” असे प्रतिपादन समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी आपल्या व्याख्यानात केले.

              ते कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवार,अमरावती तर्फे बालसंस्कार व ज्येष्ठ नागरिक परिवार,विरूंगळा केंद्र (काळा मारोती जवळ) वि.म.वि.परिसर अमरावती येथील सभागृहात कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतिदिन आणि शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती सप्ताहानिमित्त दि.२१ डिसेंबर २०२५ ला संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून ” संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची आज गरज ” या विषयावर सतत दोन तास विचार व्यक्त करीत होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शैलजाताई शंकरराव खोकले,(अध्यक्ष,कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवार),प्रमुख वक्ते अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, प्रमुख अतिथी उपाध्यक्ष श्री मधुकरराव गो.वाकोडे, वृक्षमित्र नारायण मेंढे, वृक्षप्रेमी मा.मधुभाऊ हिरेकर, सचिव प्रा.प्रमोद मु.गावंडे, कोषाध्यक्ष श्री अरुण ना.भेटाळू होते.

       अध्यक्ष,प्रमुख वक्ते,प्रमुख अतिथी यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन केले.

         कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शैलजाताई खोकले व मान्यवरांनी केला.

      प्रा.अरुण बुंदेले यांनी ‘संत गाडगेबाबा’ व ‘भाऊसाहेब’ हे स्वरचित वंदनगीत मधुर आवाजात गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले तर मधुभाऊ हिरेकर यांनी संत गाडगेबाबांचा वेश परिधान करून ‘अंतिम सत्य ‘या कवितेचे गायन केले.

*संत गाडगेबाबा व भाऊसाहेबांचे कार्य महान- श्रीमती शैलजा खोकले*

       ” संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य महान आहे.संत गाडगेबाबांचे व भाऊसाहेबांचे चरित्र प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.गाडगेबाबांच्या झाडूने व भाऊसाहेबांच्या खडूने समाजात फार मोठे परिवर्तन घडून आले.” असे विचार अध्यक्षीय भाषणातून श्रीमती शैलजाताई खोकले यांनी व्यक्त केले.

                प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय व प्रास्ताविक सचिव प्रा.प्रमोद मु.गावंडे, संचालन सदस्य श्री ज्ञानेश्वरराव टोपले,आभार कोषाध्यक्ष श्री अरुण भेटाळू यांनी मानले.

        याप्रसंगी कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवाराचे माजी उपाध्यक्ष कै.डॉ.रघुनाथराव पवार यांना भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         कार्यक्रमाला सहसचिव प्रा.विद्याधरराव म.मेटकर,सदस्या प्रा.सौ.मिनाताई मु.गावंडे,श्रीमती एस.आर.खाजोने,सदस्य रामदासराव सु.तायडे,सदस्य श्री.अशोकराव गो.निंभोरकर, प्रा.डॉ.मुरलीधरराव गावंडे, रामदास‌जी तायडे (सदस्य), संजयजी सतरके,मधुकरराव सगणे,मनोहरराव सांडे,श्रीमती मंदाताई कडू,गुणवंत रोडे आणि कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवाराचे सदस्य व परिसरातील रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here