

▪️अध्यक्षा डॉ.इंदुमती थोरात यांचे मुख्य मार्गदर्शन
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.24डिसेंबर):- बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका (महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन )संघटनेच्या वतीने दिनांक २३ डिसेंबर रोजी निरंतर परिचर्या प्रशिक्षण (Continuing Professional Development – CPD) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात जे.जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, पोद्दार रुग्णालय, ईएसआय रुग्णालय तसेच नागरी सेवा केंद्र, वांद्रे येथील सुमारे ३०० परिचारिकांनी यशस्वी सहभाग घेतला.
परिचारिकांच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ होणे, अद्ययावत वैद्यकीय ज्ञान मिळवणे तसेच रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करणे या उदात्त उद्देशाने या CPD कार्यक्रमाचे निशुल्क आयोजन परिचारिकांसाठी संघटनेमार्फत करण्यात आले होते.
Infection prevention and control in hospital setting या विषयावर विविध तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. अर्चना बडे, सुपरिटेंडंट ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस प्रबंधक, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अतिथी म्हणून सर ज जी रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, अधिसेविका योजना बेलदार , महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे राज्य सरचिटणीस विशाल सोनार आणि परिचारिकांच्या ज्येष्ठ नेत्या व संघटनेच्या अध्यक्षा कमल वायकोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी परिचारिकांच्या सततच्या प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे परिचारिकांचा आत्मविश्वास वाढतो व आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे रुग्णांपर्यंत पोहोचते, असे मत व्यक्त केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती व संपूर्ण टीमचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजक अध्यक्ष कविता ठोंबरे यांनी सर्व मान्यवर, प्रशिक्षक, सहभागी परिचारिका तसेच सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
आयोजक सचिव निखिल केतकर व टीम यांनी कार्यक्रमाशी संबंधित नोंदणी, माहिती संप्रेषण, सादरीकरण व इतर सर्व डिजिटल कामे प्रभावीपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रबंध नियोजन व आर्थिक जबाबदारी पूनम गायकवाड यांनी यथोचित सांभाळली तर सूत्रसंचालन स्नेहलता तीमोती यांनी प्रभावी व सुसूत्र पद्धतीने केले.
या कार्यक्रमासाठी भक्कम पाठबळ इंदुमती थोरात मॅडम यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेच सर्व श्रेय या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली CPD टीम व वरिष्ठानी वेळोवेळी दिलेले अमूल्य मार्गदर्शन व खंबीर पाठिंबा यांना जाते अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.











