Home महाराष्ट्र अखेर घरभेदीचा बुरखा फाटला !

अखेर घरभेदीचा बुरखा फाटला !

134

▪️ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर,अंबरनाथ यांचे मनोगत !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मी गेली अनेक वर्षे ओरडून ओरडून सांगत होतो की, धनंजय बोडारे हा घरभेदी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहून शिंदेसेनेचा अजेन्डा राबवणारा हा घरभेदी घातक आहे. त्यावरून मला अनेक बोडारेनिष्ठ लोकांनी ट्रोल केले. पक्ष नेतृत्वाचा त्याने इतका विश्वास संपादन केला होता की, मी त्यांच्याबद्दल काही लिहिले तर मला व्हिलन समजत असत. आज मात्र मी जे सांगत होतो, ते तंतोतंत खरे होणार आहे.

निष्ठेचा बुरखा व कातडे दूर करून हा ढोंगी आज भाजपच्या दावणीला बांधून घेत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख या उच्च पदाच्या मोबदल्यात भाजपाशी सौदेबाजी करून मलाईदार पद व आपल्या सोबतच्या बोडारेनिष्ठ लोकांना उमेदवारीच्या भिकेचा कटोरा घेऊन हा ढोंगी भाजपच्या दरबारात खेटा मारत होता. आज त्याच्यावर दया दाखवत भाजपने आपल्या दरबारात पाचारण केले आहे. 

गेल्या दोन वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेनेचे खच्चीकरण करण्याचे धोरण याने बेमालुमपणे राबवले. पक्षपाती धोरण व गटबाजी करून असंख्य निष्ठावंताना बाहेरचा रस्ता दाखवला. फक्त कल्याण विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी बोडारे शिवसेनेत तग धरून होता. नगरपालिका निवडणुकीत अंबरनाथची शिव सेना पार धुळीस मिळवून आत्ता ही स्वारी दिग्विजय मिळवल्याच्या थाटात गनिमांना पराभवाचा “तोहफा” देण्यासाठी हुजरेगिरी करीत कुर्निंसात करण्यास जात आहे. अंबरनाथची कमिटी बरखास्त करण्याची मागणी कालच्या चिंतन सभेत करण्यात आली. ज्या शिवसेनेने गेली ३० वर्षे सर्व काही दिले तिच्या कोखावर लाथ मारून हा गद्दार घातकी शत्रूशी हातमिळवणी करण्यास जात आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेस आपल्या आईची उपमा देऊन जो निष्ठेच्या आणाभाका घेत होता,तो आई समान शिवसेनेशी गद्दारी करीत आहे. या वरुन बोडारे हा माणूस नेता म्हणून लायक नाही परंतू माणूस म्हणूनही पात्र नाही हेच दिसून येते.

बोडारे जाणार हे नक्की होते तरी नेते मंडळी बोडारेच्या मोहजालात इतके अडकले होते की ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्याच्यावर इतका विश्वास होता की खुद्ध उद्धव ठाकरे साहेबांनी कल्याणच्या जाहीर प्रचार सभेत धनंजय बोडारेच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची तुलना बोडारेशी केली होती. त्यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांचा तीळपापड झाला होता परंतू शिवसैनिक तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करावा, तसे गप्प राहिले होते. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठाच्या उमेदवारांचे जे पानिपत झाले त्याला बोडारेचे बोटचेपे धोरण कारणीभूत होते, हे एव्हाना उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाला बळ देण्याचे काम यांनीच केले. मराठा सेक्शनची शाखा शिंदे सेनेने काबीज केली तरी बोडारेने उग्र विरोध न करता मध्यवर्तीची ऐतिहासिक शाखा शिंदे गटाच्या घश्यात जाऊ दिली. त्यापूर्वी योजनाबद्धरित्या मध्यवर्ती शाखेचे महत्व कमी करून संतोषनगर शाखेचे महत्व वाढत ठेवले.

सरिता खानचंदाणी आत्महत्येचे भूत बोडारेच्या मानेवर बसले आहे. तिचा जो छळ झाला त्याची दामदुप्पट वसुली नियती करणार आहे. आज अटकपूर्व जामीन नामंजूर होण्याच्या भीतीने बोडारे भाजपात जात असला तरी सरिता खानचांदणी विक्रम व वेताळ प्रमाणे बोडारेच्या मानगुटीवर शेवटपर्यंत बसणार आहे. या बोडारेने अनेकांचे राजकीय भवितव्य मातीमोल केले आहे. अनेकांवर पक्ष सोडून जाण्याची नामुष्की आणली होती. निव्वळ बोडारेच्या पक्षपातीपणामुळे असंख्य शिवसैनिक मनसे व शिंदे गटात गेले आहेत.

बोडारे गेल्यामुळे अनेक शिवसैनिकांत आनंदाचे वातावरण आहे. सुरेश केणे, विजय सावंत सारख्या माजी नगरसेवकांना अडगळीत टाकून घरातील तीन सदस्य नगरसेवक केले. महत्वाची सर्व पदे बोडा रेनीच हस्तगत केली. आत्ता बोडारे मुक्त शिवसेना मोकळा श्वास घेईल. सर्व नव्या जुन्या शिवसैनिकांची मोट बांधून आपण आपली मूळ बाळासाहेबांची शिवसेना पुनर्जीवीत करू या.

महापालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पक्ष वाऱ्यावर सोडून बोडारेने अवसानघात केला आहे. अश्या दगाबाजाला नियतीही कधीच माफ करणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here