Home चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांचा 20 वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांचा 20 वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा

75

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.16डिसेंबर):- पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिचाळ येथे वर्ग १ ते १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या १९९० च्या बॅच चे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मित्रांनी पाचवा स्नेहमिलन सोहळा एकत्र येत साजरा केला आपल्या संसारातून नोकरी धंद्यातून उसंत काढत सर्व मित्र एकत्र येत आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत हरवून गेले सर्व काही विसरून बालपणीचा विविध खेळ खेळून देहभान विसरून बालवयात रममाण झाले गरीब श्रीमंत उच्चशिक्षित किंवा शेती व्यवसायात असलेल्या सर्वच मित्रांना एकत्रित करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आपली नाती आपली माती याच अभिमान समोर ठेवत एकत्र येण्याचं आणि एकत्र राहायचं ठरवून त्यांना मदत करण्यासाठी गर्दीच्या दुनियेत न हरवला मित्र म्हणून एकत्र येण्याचा प्रेरणादाई संकल्प करण्यात आला.

ह्या स्नेहमीलन सोहळ्यासाठी प्रा. नीलकमल उके, प्रा. राजेश नंदपुरे, प्रा. महेंद्र काटेखाये. नरेंद्र बिलवणे माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर भानारकर, केंद्र प्रमुख कृष्ण जिभकाटे, संजय नखाते ,सुरेश काटेखाये ,माजी जी. प. सदस्य माधव नेवारे ,सुरेश पडोळे यांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या स्नेहमीलन सोहळ्यास सर्व मित्रांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here