

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.30नोव्हेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डाॅ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सत्र तिसऱ्या व चौथ्यासाठी MSc.Botany Syllabus Structuring of Plant Biotechnology विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील 25 महाविद्यालयातील एकूण 42 प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य प्रा.डाॅ.के.डी.महाजन ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.के एन.सोनवणे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.एम बी. पाटील यांची उपस्थिती लाभली. या कार्यशाळेप्रसंगी अभ्यास मंडळ सदस्य डाॅ. एस.वाय पाटील, डाॅ. गीता पाटील, उपप्राचार्य प्रा. डाॅ आर.एम. बागुल तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.आर.एम बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थ्यांला भावी जीवनात मार्गदर्शक ठरेल असा अभ्यासक्रम ठरविण्यात आला.सदर कार्यशाळेत तिस-या सत्रातील दोन पेपर व चौथ्या सत्रातील 4 पेपरचा अभ्यासक्रम गठीत करण्यात आला.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीमती विशाखा देसले यांनी केले तर आभार डाॅ.प्रदीप सौदागर यांनी मानले.
कार्यशाळेच्या सत्राचे सूत्रसंचालन डाॅ जे.जी. पाटील व प्रा. फुलचंद पाटील यांनी केले. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.के. पटेल व संशोधक विद्यार्थी रमण पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर.व्ही.पाटील यांचे सहकार्य लाभले.यावेळी महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.











