

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.30नोव्हेंबर):- महात्मा फुलेंनी जातिभेद नाकारून सत्यावर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना केली.त्यांनी बालविवाह आणि विधवांच्या दुर्दशेविरुद्ध आवाज उठविला. विधवांच्या केशवपनाचे निर्मूलन करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला.विधवा महिलांसाठी आश्रम सुरू केले. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला.अस्पृश्यता निवारण स्वआचरणातून केले.अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके आणि लेख लिहून पुरोगामी विचार समाजात पेरले. महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांती करणारे थोर क्रांतिकारक होतं.” असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे महात्मा फुले चौक, अमरावती येथे दि.२९ नोव्हेंबर २०२५ ला संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मंदाकिनी निमकर (अध्यक्ष,महात्मा फुले शिक्षण समिती, अमरावती.),प्रमुख वक्ते अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,प्रमुख अतिथी प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ ),प्रशांत लांडे (उपकार्याध्यक्ष माळी महासंघ, अमरावती.),डॉ.अशोक उमप (अध्यक्ष, बचत गट ) इंजि. वासुदेव चौधरी (अध्यक्ष,इ. मा.स.),राजेंद्र हाडोळे (ओबीसी नेते),श्रीकृष्ण माहोरे (कामगार नेते),वसंतराव भडके, रामलाल खैरे, देविदासभाऊ उमप, गणेशराव मानकर,सतीश मेहरे, श्रीकांत नागरीकर,विनोद बोबडे, बाबूलाल भुसारी,दिनेश भूसारी, सुधीर ढाकुलकर, नंदू बोंबटकर, सांडे साहेब होते. तसेच बंडूभाऊ ढाकुलकर जनार्दन बोळे, अमोल पवार, अभिजीत कुऱ्हेकर, संतोष कऱ्हेकर, विनोदराव कुऱ्हेकर, मधुकरराव धानोकर, प्रकाशराव कुरळकर, सुनीलराव वानखडे, रुपेशराव फसाटे,गजानन आजणकर यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अध्यक्ष,प्रमुख वक्ते,प्रमुख अतिथी व उपस्थितांनी हार अर्पण करून अभिवादन केले.
अध्यक्षीय भाषणात मंदाकिनी निमकर यांनी, “फुले दाम्पत्यांनी अस्पृश्यता आणि जातिभेदाविरुद्ध तीव्र लढा दिला होता. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी त्यांनी फार मोठे कार्य तत्कालीन काळात करून शेतकरी व कष्टकरी यांना न्याय मिळवून दिला. सत्यावर आधारित जीवन जगण्याची शिकवण समाजाला महात्मा फुले यांनी दिली.”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड, श्रीकृष्ण माहोरे, शिवलाल चौधरी यांनी मनोगतातून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर ढाकुलकर तर आभार सतीश मेहरे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य फुले – शाहू -आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.











