Home महाराष्ट्र समता दिनी सार्वजनिक सत्यधर्मीय 2026 दिनदर्शिकेचे फुले वाड्यात प्रकाशन सोहळा संपन्न!!!

समता दिनी सार्वजनिक सत्यधर्मीय 2026 दिनदर्शिकेचे फुले वाड्यात प्रकाशन सोहळा संपन्न!!!

90

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30नोव्हेंबर):-सत्यशोधक समाज संघ निर्मित सार्वजनिक सत्यधर्मीय सन 2026 दिनदर्शिके चे प्रकाशन समता भूमी येथे सामाजिक क्रांतीकारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित सत्यशोधक केशवराव जेधे यांचे नातू व श्री.शिवाजी मराठा संस्थेचे खजिनदार मा.जगदीश जेधे यांचे व महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती चे सदस्य रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी समता भूमीवरील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या व स्री शिक्षणाचे आद्यप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे सुरुवातीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अजय खेडेकर ,संदीप लडकत सामाजिक कार्यकर्ते डॉ.बी.के .यादव ,संजयबाबा करपे , रामराज्य बँकेचे संचालक बाळासाहेब रायकर समता परिषद चे राजेंद्र शेलवन्ते, आबा भोंगळे उपस्थित होते. 

याप्रसंगी जगदीश जेधे यांनी प्रतिपादन केले की या दिनदर्शिकेचे हे पाचवे वर्ष असून फुले दांपत्य यांचे महत्वाचे कार्याविषयी तसेच इतर सत्यशोधक महापुरुषांच्या महत्वपूर्ण घटना कार्याविषयी अत्यंत मौलिक उपयुक्त माहिती दिल्याने समाजाला आपल्या महापुरुषांनी केलेल्या अलौकिक कार्याची सहज महती उपलब्ध होत आहे. तरूणापासून मोठ्या व्यक्ती व महिलांना या माहितीपूर्ण दिनदर्शिके मुळे एक प्रेरणा मिळत असते. प्रत्येक घराघरात ही दिनदर्शिका दर्शनी भागात लावली गेली पाहिजे असे सांगून सत्यशोधक केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी फुले दांम्प्त्याचे सत्यशोधक कार्य पुढे नेले त्याच प्रमाणे आपण सर्वांनी कृतीशील कार्य करू या हीच खरी त्यांना आदरांजली होईल असे देखील म्हंटले.

कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक समाज संघाने केले तर संयोजन व कार्यक्रमाची सांगता सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन उपस्थितांकडून पाठीमागे म्हणून घेतले तर लहू अनारसे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here