

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.29नोव्हेंबर):-संविधान दिनाच्या निमित्ताने भंडारा न्यायालयात भंडारा जिल्हा वकील संघाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन राहांगडाले, सचिव ॲड.धनंजय बोरकर, ॲड महेंद्र गोस्वामी, ॲड मधुकर वडेटवार, ॲड लोणारे, ॲड नेहा शेंडे, ॲड राकेश सक्सेना यांच्या सह वकील संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.











