

▪️राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल विकास पासलकर यांचा सत्कार
✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.27नोव्हेंबर):- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. जयंत जायभावे लिखित भारतीय संविधानातील लोकमंत्र या ग्रंथाच्या राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे हिंदुराव हुजरे-पाटील, अनिल म्हमाने, उपायुक्त परितोष कंकाळ, पैलवान बाबा महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, नेते, उद्योजक विकास पासलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. राजू सावंत, बाळासाहेब पाटील, सुरेश हुजरे-पाटील, सुनील चिले, शिवाजीराव खोत, अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मदन पवार, प्रा. देवदत्त सावंत, तुळशीराम जाधव, शंकर पुजारी, जितेंद्र चोकाककर, श्रुती हजारे, प्रा. शुद्धोधन मोडक यांचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार तर मंगेश ताटे, बप्पासाहेब शेजूळ, अशोक मानकर, श्रीपाद पटवर्धन, बाबुराव वरपे, कुमुद डाखोळे, शुभदा येवले, रावसाहेब शिंदे, एन. डी. चौगले, महेंद्र रंगारी, विक्रम कांबळे, निलिमा पाटील, सुभाष पारधी, सतेशकुमार माळवे, डॉ. संजय शिंदे, सचिन गायकवाड, प्रा. राजेंद्र गायकवाड, अस्मिता कट्यारे, दिलीप वाघमारे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, राजश्री मधाळे यांचा सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महेंद्र रंगारी, मनोहर पाटील, प्रमोद साठे, लालू गुजलवाड, सुशांत पाटील यांचा महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, संविधान जनजागृती अभियान, सत्यशोधक प्रागतिक मंच, निर्मिती विचारमंच यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास संविधान प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने, आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर यांनी केले.











