

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.27नोव्हेंबर):-सध्याची स्थिती बघता सोशल मीडिया हा प्रभावी माध्यम ठरत असून याद्वारे विधायक कार्याची रूजवणुक करता येते हे ग्राम परिवर्तन समिती मांडवा या व्हाट्सअप ग्रुप ने दाखवून दिले आहे. या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या चार दिवसात लोकसहभागातुन शाळेस फोटो स्टॅन्ड, सहा भिंतीवरील घड्याळी, ध्वनीप्रणाली (स्पीकर) भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भेट देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक कैलास भरगाडे यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मनोज रामधनी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप आबाळे, माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष अविनाश आबाळे, प्रकाश राठोड,भगवान जयस्वाल, बजरंग राठोड, संदीप ढोले,विश्वास कांबळे,अजय ढोले, विकास साखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नथ्थुजी लांडगे,सतिष चव्हाण, दत्ता वानखेडे, सचिन साखरे,सौरभ डोळस, राजेंद्र गादेवार, शंकर काष्टे, गोपाल वानखेडे, विजय आडे, अंकुश राठोड, योगेश ढोले, ऋषिकेश पुलाते, समाधान आबाळे, लखन दाढे, चिंतामण पुलाते या दात्यानी सहकार्य केले.
यावेळी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. इत्यादी ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश नालमवार यांनी केले तर आभार विश्रांती मस्के यांनी मानले.











