Home महाराष्ट्र सततच्या विजेच्या लपंडावाने राजुरावासीय नागरिक त्रस्त : जय भवानी कामगार संघटनेकडून सुरज...

सततच्या विजेच्या लपंडावाने राजुरावासीय नागरिक त्रस्त : जय भवानी कामगार संघटनेकडून सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वीज वितरण कंपनीला निवेदन

103

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.12नोव्हेंबर):– राजुरा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला सततच्या विजेचा लपंडाव आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. वारा – वादळ असो वा नसो, राजुरा परिसरात दररोज काही वेळ विजेचा पुरवठा खंडित होतो, ज्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यवसायिक वर्ग यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

        सततच्या वीज खंडितमुळे शासनाच्या ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या शासकीय, शैक्षणिक आणि खाजगी कामांवर मोठा परिणाम होत आहे. इंटरनेट आणि वायफाय कनेक्शन खंडित झाल्याने रुग्णालये, शाळा, बँका, कार्यालये आणि घरगुती कामे ठप्प पडतात. नागरिकांना दररोज या समस्येचा त्रास सहन करावा लागत असून, ही समस्या केवळ असुविधा नसून राजुराच्या विकासाला अडथळा ठरत आहे.

     रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघातांचा धोका वाढतो, तर रुग्णालयांमधील वीज खंडित झाल्याने रुग्णसेवा धोक्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे सिंचन पंप बंद पडतात, लहान दुकाने, वर्कशॉप्स आणि उद्योगधंदे ठप्प होतात. शेती आणि लघुउद्योगांवर आधारित राजुराच्या अर्थव्यवस्थेसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे.

         या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून काँग्रेसचे कामगार नेते, जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राजुरा कार्यालयात निवेदन सादर केले. संघटनेने या निवेदनात राजुरा तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे आधुनिकीकरण, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे आणि आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ पुरविण्याची मागणी केली.

       यावेळी संघटनेचे युवा शहराध्यक्ष रोहित बत्ताशंकर, तसेच राजू लड्डा, श्रावण साळवे, अतुल सिंग, साहिल कायडिंगे, चेतन मेश्राम, बालाजी चौधरी, ऋतुज जुलमे, आर्यन दुबे आदी उपस्थित होते. वीज पुरवठा व्यवस्थेत लवकर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here