Home महाराष्ट्र श्री संत जनाबाई यांची पालखी निघाली पांडुरंगाच्या भेटीला

श्री संत जनाबाई यांची पालखी निघाली पांडुरंगाच्या भेटीला

61

प्रतिनिधी (अनिल साळवे,8698566515)

“धरिला पंढरीचा चोर” पांडुरंगाच्या देवळासमोर झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप होतो आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाचीच चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे संत जनाबाई यांनी आपल्या अभंगात म्हटले. याच भक्ती भावाने गंगाखेड येथे जन्मलेल्या श्री संत जनाबाई यांचा दिंडी पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल नामाचा जयघोष करत (दिनांक २३ जून सोमवार) रोजी पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
1972 पासून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला संत जनाबाई यांचा पालखी सोहळा निघतो गंगाखेड येथील वारकरी यांनी गेल्या 53 वर्षापासून संत जनाबाई यांच्या दिंडी पालखीची परंपरा कायम ठेवली आहे. संत जनाबाई यांची निस्सिम भक्ती पाहून भगवंत विठ्ठल संत जनाबाई यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी संत जनाबाई यांच्या प्रत्येक कामात हातभार लावला संत जनाबाई यांना श्री विठ्ठलाच्या लाडक्या भक्तापैकी एक म्हटल्या जाते.दिंडीमध्ये गंगाखेड परिसरातील गावातील कीर्तनकार, मृदंगाचार्य, टाळकरी, झेंडेकरी यांच्यासह अन्य सेवा देणारे वारकरी बांधव, भाविक भक्त मोठ्या भक्तीभावाने सहभागी होऊन विठ्ठल नामात रमुन गेले फुलांनी सजवलेल्या रथांमधून संत जनाबाई यांची पालखी संत जनाबाई मंदिर येथून निघून दिलकश चौक, होळकर चौक, आंबेडकर चौक, महाराणा चौक परळी मार्गे ढोल ताशांच्या व विठुरायाच्या जय घोषात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here