Home चंद्रपूर राज्य पुरस्कार प्राप्त वसंतराव कडु गुरुजींचा आकाशवाणीवर भजनाचा कार्यक्रम

राज्य पुरस्कार प्राप्त वसंतराव कडु गुरुजींचा आकाशवाणीवर भजनाचा कार्यक्रम

62

 

चिमुर/प्रतिनिधी :-

नेहरू विद्यालय चिमुरचे सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमुरचे ग्रामसेवाधिकारी वसंतराव देवराव कडु गुरुजी मागील ७५ वर्षापासुन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजने, पर्यावरण गीते, अंधश्रध्दा निर्मुलन गीते व शालेय पाठ्यपुस्तकातील कविता गायनाचा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयातुन आजतागायत राबवित आहेत. आज स्थितीत जवळपास साडे पाच लाख विद्यार्थ्यांना आपल्या रसाळ व मधुर गायनातुन मार्गदर्शन केले. तसेच अनेकदा दुरदर्शन व आकाशवाणी केंद्राव्दारे कार्यक्रमाचे प्रसारण सातत्याने होत असते. तसेच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले.

नुकतेच आकाशवाणी नागपूर केंद्रावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या देशभक्तीपर व समाजजागृतीपर भजनाचे रेकार्डींग होवुन १३ व २० जुनला रात्रौ ८.१५ वाजता कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. वसंतराव कडु गुरुजी यांच्या सोबत प्रा. अशोकराव चरडे, परमानंद बोरकर, देविदास मेश्राम, बाबाराव दोहतरे, संगिताताई बाळबुधे, तबला वादक गणेश मडावी यांचा सहभाग होता.

त्यांच्या या ८२ व्या वर्षीही भजनसेवा सेवाकार्य व आकाशवाणी नागपूर केंद्रावर होणाऱ्या भजन कार्यक्रमास वसंतराव कडु गुरुजी व संचास श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मारोतराव अतकरे, दिलीप राचलवार, प्रकाश बोकारे, कृष्णा तपासे, निलम राचलवार, गिरीष भोपे, राजु देवतळे, रमेश कंचर्लावार, राजु पाटील झाडे, हरिभाऊ डोये, रविंद्र कापसे, शामराव सुर, केवळराम अतकरे आदीने शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here