Home चंद्रपूर सामाजिक संस्थांनी मांडल्या राजुरा शहर व परिसरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्यांची व्यथा-एकोणतीस सामाजिक...

सामाजिक संस्थांनी मांडल्या राजुरा शहर व परिसरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्यांची व्यथा-एकोणतीस सामाजिक संघटना एकवटल्या! – तात्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी.

251

 

 

राजुरा ११ जुन
राजुरा शहर व परिसरातील नागरिक काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड देत आहे. सध्या महामार्गाचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरु असल्याने व वर्धा नदीजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीच्या ढिगाऱ्यामुळे पावसात रस्त्यावर चिखल साचत असून व धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने निष्पाप नागरिकांना आपले जीव अपघातात गमवावे लागत आहे. नगरपरिषदेची जाचक करवाढ, शहरातील वाढती गुन्हेगारी , चोरीचे प्रमाण व निकृष्ट दर्जाचे संत गतीने सुरू असलेले गट्टू लावण्याचे कामामुळे उद्भवलेली पार्किंगची समस्या , अनियंत्रित जड वाहनाची वाहतूक, पंचायत समिती चौकात वाहतूक सिग्नल व्यवस्था बंद आहे, वर्दळीच्या ठिकाणी पुरेशी पार्कींग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, शहरातील मुख्य मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था नाही अशा विविध समस्यांचे निवेदन तयार करून जवळपास एकोणतीस सामाजिक संघटना एकत्रित येऊन या ज्वलंत समस्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर, देवराव भोंगळे, आमदार राजुरा, रवींद्र माने , उपविभागीय अधिकारी राजुरा, डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन राजुरा, मुख्याधिकारी, नगर परिषद राजुरा यांना निवेदनाद्वारे समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब , जेसीआय राजुरा क्लब डायमंड सिटी , व्यापारी असोसिएशन , रामबाग विकास समिती, धनोजे कुणबी समाज , राजपूत क्षेत्रीय समाज , तैलिक समाज संघटना, सुतार समाज संघटना , आर्य वैश्य कोमटी समाज मंडळ, राजस्थानी समाज मंडळ , पत्रकार संघ , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , जामा मस्जिद वक्त कमिटी , ब्राह्मण समाज मंडळ , खैरे कुणबी समाज मंडळ , बार असोसिएशन, नाभिक समाज मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, भारतीय बौद्ध महासभा , गुरुदेव सेवा मंडळ, मेडिकल असोसिएशन राजुरा , ख्वाजा सिया मुस्लिम समाज बांधव , फ्रेंड्स स्पोर्ट क्लब, माजी विद्यार्थी संघ, तेली समाज युवक मंडळ , जिवनदिप पर्यावरण संस्था, बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना आदी सामाजिक संघटनांचा समावेश होता.

———————————————

विवीध समस्यांच्या अनुषंगाने आलेल्या शिष्टमंडळाशी उपविभागीय अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. लवकरच पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, महामार्ग प्रशासन व निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक आसलेल्या यंत्रणेची संयुक्त बैठक घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे यावेळी रविंद्र माने , उपविभागीय अधिकारी म्हणाले.
———————————————

विवीध सामाजिक संघटना एकत्रित येऊन सर्व सामान्य माणसाच्या अडीअडचणी, समस्या निकाली काढण्यासाठीचा हा प्रयत्न सर्वत्र चर्चेत आहे. विचारसरणी, कार्यपद्धती वेगवेगळी असली तरीही सर्वसामान्य नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी या सर्व एकोणतीस सामजीक संस्था – संघटना एकत्रित आल्याने शासन – प्रशासनाला ही तात्काळ उपाययोजना कराव्या लागतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here