Home गडचिरोली सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने वटसावित्री निमित्त वृक्षारोपण

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने वटसावित्री निमित्त वृक्षारोपण

92

 

*कुरखेडा:-* श्रीरामनगर, वृंदावन कॉलनी कुरखेडा येथे वटसावित्री पौर्णिमा निमित्त सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने धमदीटोला येतील मोलमजुरी करणाऱ्या व विधवा भगिनी सोबतच वृंदावन कॉलनी येथील सुहासिनी महिलांच्या उपस्थितीत करंजीचे रोपटं लावून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला.
मोलमजुरी करणाऱ्या व विधवा महिलांना हळदकुंकू लावून त्यांच्या सोबत स्नेहबंधनाचे धागे विणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. या शुभ प्रसंगी वृंदावन कॉलनी येथील संगीता ठलाल, रेखा मोहणे, वैशाली कुमरे, तेजस्विनी कुमरे, रामगढ येथील अश्विनी कोल्हे, धमदीटोला येथील अहिल्या कपूर, बेनू कपूर, मंगतीन कपूर, रेखा कपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here