Home महाराष्ट्र पुसेगाव मध्ये बटाटा बियाणे येण्यास सुरूवात.

पुसेगाव मध्ये बटाटा बियाणे येण्यास सुरूवात.

85

सातारा, खटाव ,प्रतिनिधी /नितीन राजे 9822800812

पुसेगाव, तालुका. खटाव ,जिल्हा सातारा .पुणे मंचर नंतर सर्वात मोठी बटाटे उत्पादनाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी ही पेठ असून येथे बटाटा बियाणे येण्यास सुरुवात झाली आहे.

बटाट्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असून सातारा, फलटण ,वडूज, पंचक्रोशीतून अनेक भागातून शेतकरी विश्वासाचे बियाणे मिळणार म्हणून येत असतात.मागील काही दिवसापासून बटाट्याचे उत्पादन या भागात कमी झाले आहे.असे असली तरी मागील काही दिवसात बटाटा संशोधन केंद्र पुसेगाव मध्ये सुरू करणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केले होते. त्यामुळे बटाटा संशोधन केव्हा होणार याची देखील उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल . पुसेगाव ही बटाट्याची राजधानी म्हणून नावा रूपास येईल सध्या बटाट्या न करता आले, व ऊस या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने व मागील काही दिवसात बियाणे उगवण यामध्ये शेतकऱ्यांना त्रास झाला किंबहुना शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. खरिपाला मुळात नगदी पिकांसाठी ओळखला जातो , त्यामुळे आता चालू वर्षी काय होणार शेतकरी बटाट्या उत्पादनाकडे लक्ष देणार का इतर सोयाबीन ,घेवडा , वाटाणा अन्य पिकाकडे जाणार ,?जवळजवळ 400 ते 500 ट्रक बियाणे खपाचे प्रमाण आता ते बरेचसे घटलेली दिसून येते. बाजारपेठेत बटाटा बियाणे आल्यामुळे व पाऊस वेळेत पडल्यामुळे शेतकरी कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here