गंगाखेड :-सोनपेठ तालुक्यातील मौजे पोंडूळ येथील पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत रोड नालीचे काम करत असताना ते काम अर्धवट केल्याची तक्रार रामभाऊ बाबुराव जाधव यांनी कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्राम सडक योजना बांधकाम विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या कडे केली असून. या तक्रारी मध्ये संबंधित काम चालू असताना गावातील रामभाऊ बाबुराव जाधव यांच्या घरापासून ते महादेव पंडितराव जाधव यांच्या घरा पर्यंत अर्धवट राहिलेली नालीचे पूर्ण काम करण्यात यावे. या साठी गुत्तेदारास विचारणा केली असता त्यांच्या कडून असे कळले कि रामकिशन बळीराम जाधव हे खोदकाम करू देतनाहीत.हे खोदकाम रोखल्या मुळे घाण पाणी आमच्या घरात येत असून, सदरील काम पाऊस सुरु होण्याच्या आत खोदकाम करून नाली चे पूर्ण काम करण्यात यावी अशी तक्रार करण्यात आली असून या तक्रारीवर रामभाऊ बाबुराव जाधव यांची स्वाक्षरी आहे.




