चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हा परिषद ला नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी भेटी देऊन ,सतत विकास कामांची पाहणी करत आहे. नुकतीच भद्रावती तालुक्यात मासळ येथिल कचरा वर्गीकरण शेडचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी ग्रामस्थांशी हितगुज करताना गाव स्तरावर प्रत्येक गावात कचरा वर्गीकरण होणे काळाची गरज असून, यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार होतं. या सेंद्रिय खताचा वापर करून शेती सुपीक करता येते. तेव्हा प्रत्येक गावात कचरा वर्गीकरण प्रक्रिया नियमित केली पाहिजे. असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी व्यक्त केले.
भद्रावती तालुक्यातील दौऱ्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी भद्रावती तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन गावात चालू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. मासळ गावातील कचरा वर्गी करण शेडचे लोकार्पण केले. ग्रामपंचायत चपराळा ,चालबर्डी रयत, मासळ, सागरा ,चंदनखेडा, मुधोली येथील वृक्ष लागवड, गोडाऊन, बचत गट भवन, फळबाग लागवड या कामांची पाहणी केली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या मजुरांशी संवाद साधून कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. गाव स्तरावर वर ही कामे वेळेत पूर्ण करा .कामात गुणवत्ता राखा. गावात नियमित वृक्ष लागवड करा .गावाचा परिसर स्वच्छ ठेवा. गावात कुठेही घाणीचे साम्राज्य दिसणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छतेविषयी गावातील लोकांना जागृत करा. असे निर्देश यावेळी गाव भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी दिले. यावेळी भद्रावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा नरेगा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सपकाळ व पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी गाव भेटी दरम्यान उपस्थित होते.




