Home महाराष्ट्र स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवावे अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार : किशोर...

स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवावे अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार : किशोर सोनवणे

294

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड /सातारा : वीज कायदा २००३ मधील अधिनियम क्रमांक ४७ (५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशिर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत.

कंपनी अघोषित सक्ती करुन ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपुर्ण उल्लंघन करीत आहे, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे दिनांक १२/०६/२०२५ रोजी अप्पर तहसिल कार्यालय म्हसवड यांचे कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असलेबाबत निवेदन दिले आहे वीज वितरण कार्यालयाकडुन सध्या विज ग्राहकांच्या घरी त्यांची मागणी नसतानादेखील जबरदस्तीने डिजिटल विज मिटर बसवण्याची प्रकिया सुरु आहे, याला वास्तविक विज ग्राहकांचा तीव्र विरोध आहे. जे डिजीटल मिटर ग्राहकांना देत आहात त्याबाबत विज ग्राहकांच्या प्रचंड तक्रारी असुन त्याचे विजबील हे सध्याच्या विजबीलापेक्षा सरासरी 5 पट अधिक येत आहे त्यामुळे अशा डिजीटल मिटर ला ग्राहकांचा तीव्र विरोध होत आहे, ग्राहकांचा हा विरोध डावलून आपले कर्मचारी ग्राहकाच्या घरी कोणी नसताना त्यांची इच्छा नसताना गुपचुप हे डिजीटल मिटर बसवत आहेत. हे पुर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे, वास्तविक विज ग्राहकाची इच्छा नसताना आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करु शकत नाही त्यामुळे आपल्या कार्यालयाकडुन म्हसवड व पालिका हद्दीत सुरु असलेली ही

जबरदस्तीची विज मिटर बसविणे प्रक्रिया त्वरित थांबवावी अन्यथा विज ग्राहकांना सोबत घेवुन आम्ही आपल्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकु दिनांक १२/०६/२०२५ रोजी अप्पर तहसिल कार्यालय म्हसवड यांचे कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी. आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील याची नोंद घ्यावी,या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे यांनी दिले आहे.

या निवेदनाच्या प्रति मा. उप अभियंता सो. म.रा.वि.वि. कंपनी मर्या. दहिवडी ता.माण मा. अप्पर तहसिलदार सो. म्हसवड ता. माण मा. उपनिरीक्षक सो. पोलीस स्टेशन म्हसवड ता. माण कनिष्ठ अभियंता मघराक राज्य विदयुत वितरण कंपनी म्हसवड यांना देण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here