Home महाराष्ट्र शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ITI नशिराबाद येथे व्याख्यान संपन्न….

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ITI नशिराबाद येथे व्याख्यान संपन्न….

157

 

जळगाव प्रतिनिधी — पी डी पाटील

जळगाव — तालुक्यातील उज्वल शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नशिराबाद येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त “स्वदेशी विचार व संकल्पना” या विषयावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर. डी. राणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकाला शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन व्हिडीओ प्रणालीद्वारे कार्यक्रमाचे औपचारिक उदघाट्न करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित अतिथी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वदेशी विचार व संकल्पना, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्व, शिवरायांच्या कार्याचा इतिहास, शिवरायांचे पर्यावरण विषयक धोरण, सामाजिक समता, कुटुंब संस्कार इ. मुद्दे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमांचे अध्यक्ष आर. डी. राणे सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा संदेश दिला तसेच सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणतेही मत बनवू नका असा वडीलकीच्या नात्याने मौलिक सल्ला देखील दिला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चाचे किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते गुंजन पाटील, ITI नशिराबाद चे विवेक (मुन्ना) चौधरी सर उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कुल चे शिक्षकवृंद तसेच ITI चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खा.औ.प्र.शि. नशिराबादच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी. आर. खंडारे सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here