Home महाराष्ट्र राका येथे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल जागृती रॅली संपन्न

राका येथे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल जागृती रॅली संपन्न

55

 

राका पळसगाव (प्रतिनिधी)-
‌सायकल स्नेही मंडळ आणि नवजीवन विद्यालय राका पळसगाव च्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेल्या सायकल रॅलीस राका येथे उत्तम प्रतिसाद मिळाला . सायकल चालवा, निरोगी रहा, प्रदुषण टाळा आणि पर्यावरण वाचवा असे आवाहन करत सकाळी नियोजनानुसार नवजीवन विद्यालयापासून रॅलीला सुरूवात झाली आणि चिखली मार्गाने जाऊन परत वापस आली. सदर रॅली शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा चुटे आणि सायकल स्नेही मंडळाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक तथा राष्ट्रसंत साहित्य परिषदेचे सदस्य महेंद्र दोनोडे यांनी यशस्वी नियोजन केले होते.
सदर रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील २२ मुलामुली सायकल स्नेहींनी अथक परिश्रम घेतले. उत्तम आरोग्यासाठी प्रत्त्येक व्यक्तींनी नियमितपणे सायकल चालवावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here