Home चंद्रपूर शास. औ. प्र. संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन

शास. औ. प्र. संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन

80

चंद्रपूर (प्रतिनिधी)-
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिपेट सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे व्हिडिओ द्वारे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होत असून याप्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा उपस्थित असणार आहे.
स्थानिक पातळीवर संस्थेत नागरिक कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर एड. अजित पांडे यांचे व्याख्यान होणार आहे. तर आशिष मुंदडा यांचे कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यावेळी आय. एम. सी. सदस्य एड. नरेश मडावी, मयूर चहारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रमास संस्थेचे प्रशिक्षणार्थी, पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीना पाचारण करण्यात आले आहे , असे संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here