Home महाराष्ट्र नागपूर येथे संत कबीर जयंती दिनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा होणार सन्मान...

नागपूर येथे संत कबीर जयंती दिनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा होणार सन्मान !!!

98

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड /सातारा : क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती , तर्फे क्रांतिकारी संत कबीर यांची 627 वी जयंती निमित राष्ट्रीय मेगा फेस्टीवल 2025 दि.11 जुन 2025 रोजी फुले आंबेडकर विचारधारा जयस्तंभ चौक कामठी ,नागपूर या ठिकाणी आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक सातारा चे डॉ.दिलीप नेवसे पाटील आणि प्रमुख अतिथी म्हणून नेपाळचे जनसंख्या मंत्रालय चे मंत्री शत्रुघन प्रसाद सिह ,पिपरी,पुणे चे ह्युमन राईट अॅक्ट राष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायाधीश शिवदास महाजन आणि तेलगांनाचे जेष्ठ साहित्यिक कवी मधु बावलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
या मेगा फेस्टिवल मध्ये संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र आणि इतर राज्यात पोहचविणारे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनचे सदश्य लेखक व प्रकाशक सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा व त्यांचे सोबत हैद्राबाद चे सिने सिंगर कलाकार मुरली थेल्लम,मुबई जेष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे , आदिलाबाद चे लेखक प्रा.सुकुमार पेटकुले, साहित्यिक कवी व समाजसेवक यवतमाळ चे प्रशांत वंजारे,रमेशबाबू वाघमारे (शाहीर) ,उ.प्रदेशचे अवधेशकुमार नंद, बी.डी.संगम, लोकेश कटारीया, तेलगांनाचे अशोक महोलकर ,एम.सायलू म्हैसेकर,हिंगोलीचे बबन मोरे ,नांदेडचे त्रीरत्नकुमार भवरे , चंद्रप्रकाश देगलूरकर, नागपूरचे रवी दलाल मुंबईचे सौ.रेखा कुऱ्हेकर यांचा सन्मान होणार आहे.
सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आज पर्यंत गेली पाच वर्षात महाराष्ट्र व तेलगांना राज्यात एकूण 53 सत्यशोधक विवाह आणि 14 गृहप्रवेश /वास्तू सोहळे मोफत विधीकर्ते म्हणून अनेक महापुर्षांचे जयंती ,स्मृतिदिनी व महनीय दिनी विधीकार्य पार पाडले असून अनेक प्रथम स्मृतिदिनानिमित नातेवाईक व स्वतःचे आई वडील यांचे प्रबोधनात्मक कृतीशील सामजिक उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी केले आहेत.त्यांनी सर्व जाती धर्माचे पुनर्विवाह मेळावे देखील मोफत भरवून अनेकांचे लग्न जुळविले असून लावले देखील आहेत. ते नोकरी संभाळून सामाजिक ,शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असताना देखील त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी,हिंदी ,इंग्रजी व जर्मन फोर कलर व दिनांची साउली, महात्मा फुले गीत चरित्र व इतर पुस्तके प्रकशित केलेली आहेत. त्यामुळे त्यांचा देखील संत कबीर यांचे 627 व्या जंयती दिनी नागपूर मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होतोय ही पुणेकर आणि सातारकरांना एक पर्वणीच आहे.
याप्रसंगी गायत्री रामटेके ह्या मी सावित्री बोलते आणि कु.शीफा पवार ही मी रमाई बोलते एकपात्री नाटक सादर करणार आहेत. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप फुलझेले व सचिव नादेव पखीड्डे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here