*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*)
म्हसवड /सातारा : फलटण शहरा बरोबर तालुक्यातील गोर – गरीब, गरजू , रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले उपजिल्हा रुग्णालया मध्ये वाढती शहरी व ग्रामीण रूग्ण संख्या पाहता नवनवीन आजार पाहता चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होव्यात म्हणून 100 बेड ची आवश्यकता आहे .या करीता 100 बेड ची मंजुरी मिळावी . त्याच बरोबर, ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव तयार करून वरीष्ठांन कडे पाठववा व ट्रामा सेंटर चालु करावे व यासाठी भारतीय युवा पँथर संघटने कडून प्रांत यांना निवेदन देण्यात आले पुढे सिटीस्कॅन, सोनोग्राफी, आदी सुविधा उपलब्ध करून दयाव्यात तसेच रिक्त असलेले तज्ञ डॉक्टर पदे ही भरण्यात यावीत .अशी हि मागणी करणात आलीत्याच बरोबर नवीन परिचारिकांची हि भरती करावी या करीता हे निवेदन दिले आहे, तरी याचा आपण गंभीर पणे विचार करून पाठ पुरावा करवा व लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करण्यात यावे तसे न झाल्यास 15 दिवसा मध्ये म्हणजेच दि, 11/6/2025 रोजी विभागिय दंड आधिकारी यांच्या दालना समोर रूण हक्क आंदोलन केले जाईल असे संघटने कडून सांगण्यात आले त्यावेळी
जि. अ. लक्षण काकडे, पँ:आजित मोरे , दादा कांबळे, राहुल गुंजाळ शहर अध्यक्ष, सोनु इंगळे ता, अध्यक्ष उपस्थित होते




