Home महाराष्ट्र लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर

लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीची नूतन कार्यकारिणी जाहीर

50

गंगाखेड:-
शहरातील समर्थ हॉटेल येथे
लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीची बैठक झाली या बैठकित
झोन चेअरपर्सन लॉ.अतुल गंजेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये येणाऱ्या 2025-26 नवीन वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

सर्वानुमते अध्यक्ष म्हणून लॉ.संजय धारे(रुद्रवार), सचिव लॉ.गोपाल मंत्री, कोषाध्यक्ष .लॉ.नानासाहेब पाटील,प्रथम उपाध्यक्ष लॉ.बाळासाहेब यादव,द्वितीय उपाध्यक्ष लॉ.चंद्रकांत गादेवार यांची नावे जाहीर करण्यात आले. या नवनियुक्त कार्यकारणीचा शपथविधी सोहळा येणाऱ्या जुलै महिन्यात पार पडणार असल्याची माहिती माजी झेडसी लॉ.गंजेवार यांनी दिली.
या बैठकीस मावळते उपाध्यक्ष लॉ.बाळासाहेब यादव, कॅबिनेट ऑफिसर लॉ.गोविंदराज रोडे,कोषाध्यक्ष लॉ.अभिनय नळदकर, अध्यक्ष लॉ.जगदीश तोतला, कॅबिनेट ऑफिसर
लॉ.संजय सुपेकर, सचिव लॉ.भगत सुरवसे, उपाध्यक्ष लॉ.चंद्रकांत गादेवार,लॉ.राजू लांडगे यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here