*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड /सातारा : मुख्याध्यापिका सौ.लता विकास काकडे वय ४९ यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी पहाटे साडेपाच वाजता कराड येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना घडली.
त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. दररोज देऊर येथील शाळेला जाताना वाटेत भेटणाऱ्या महिलांशी दोन मिनिट का होईना त्यांच्याशी संवाद करत आपलंसं अन् जिव्हाळ्याचा नातं निर्माण करत असत. आज त्यांची झालेली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.
सातारा जिल्हा परिषद शाळा देऊर येथे त्या मुख्याध्यापक होत्या. त्यापूर्वी त्या आदर्की बुद्रुक, हणमंतवाडी येथे कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. या घटनेने काकडे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
लता काकडे यांच्या पश्चात पती विकास काकडे , अविवाहित एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.




