Home चंद्रपूर निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम

निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम

78

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. 9423608179

चंद्रपूर, दि. 28 मे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर द्वारा विशेष सामू‌हिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता नागपूर येथे 45 दिवसांचे निःशुल्क व निवासी मॉड्यूलर फर्निचर व फेब्रीकेशन प्रशिक्षण कार्यक्रम 2 जून ते 16 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाची माहिती लोकांना मिळावी याकरिता उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, बसस्थानक समोर चंद्रपूर येथे एकदिवसीय उद्यो्जकीय परिचय कार्यक्रम 1 जून रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाअंतर्गत मॉड्यूलर फर्निचर, इमारत बांधकाम, लाकूड, अल्युमिनियम व पीव्हीसी, सुरक्षा खबरदारी, हॅन्ड टूल्स आणि लाकूड, मॉड्यूलर किचन, लाकूड कोरीव काम, लाकूड फिनिशिंग, अडव्हांस वूड वर्किंग मशीन, उद्यो जकीय व्यक्तिमत्व विकास, उद्यो गसंधी मार्गदर्शन, उद्यो गाची निवड, यशस्वी उद्योजकांचे अनुभव कथन, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना व निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता नाव नोंदणी करण्यात येणार आहे. करिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व नोंदणी करिता 07172- 274416 / 9637536041 व मिलिंद कुंभारे ( मो. 9011667717) निनाद रामटेके (मो. 8605075370) यांच्याशी संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here