सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सातारा(दि.25मे):- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने १ जुलै रोजी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये राज्य अधिवेशन सोहळा घेण्याचे ठरले असुन हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यातील शहरी, ग्रामीण पत्रकारांनी या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो पत्रकारांना एकत्रित आणण्याचे तसेच पत्रकारांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी संघाच्या माध्यमातून सोडविण्याचे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ सदैव तयार असुन कोल्हापुर येथील राज्य अधिवेशन दिमाखात साजरा होणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे यांनी केले आहे.




