Home शैक्षणिक ज्ञानवर्धिनी हायस्कूलचा एसएससी परिक्षेत म्हसवड केंद्रात डका प्रथम व द्वितीय क्रमांकांवर मारली...

ज्ञानवर्धिनी हायस्कूलचा एसएससी परिक्षेत म्हसवड केंद्रात डका प्रथम व द्वितीय क्रमांकांवर मारली बाजी

84

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड ) मोबा. 9075686100*

 

 

म्हसवड /सातारा : म्हसवड ता. माण, जि. सातारा येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्यू. काँलेज म्हसवडचा एस.एस.सी.चा चालू वर्षीचा निकाल ९३.२४% लागला असून विद्यालयातील आर्यन सूर्यकांत गोरड या विद्यार्थ्यांने ९७% गुण मिळवून म्हसवड केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. ऋतुजा सचिन सोनवणे हीने ९६.२० % गुण मिळवून म्हसवड केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविल्या मुळे ज्ञानवर्धिनी हायस्कूल चा डंका म्हसवड केंद्रात वाजल्याने विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ज्ञानवर्धिनी हायस्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाते. आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीवर या निकालाने शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.या विद्यालयाने नेहमीच स्पर्धा परीक्षेत स्वतः ला अव्वल ठेवून एन.एन. एम.एस, शिष्यवृत्ती परिक्षेत ही सुयश संपादित करण्याची परंपरा कायम राखली आहे. चालू वर्षी विद्यालयातील ६

विद्यार्थ्यांनी ९०% टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. विद्यालयातील गुणवंत

विद्यार्थी पुढीलप्रमाणे आर्यन सूर्यकांत गोरड ९७%, कु. ऋतूजा सचिन सोनवणे – ९६.२०%, कु. तेजस्वी ज्ञानदेव कोळेकर -९४.८०%, कु. वेदिका अनिल राऊत – ९२.६०%, स्वप्निल पांडुरंग नामदे ९२.२०%, कु. मैत्रेयी मिलिंद पाठक -९१.४०%, कु. ऋतुजा धनाजी गुरव ८९.२०%, कु. अक्षरा सागर कवडे, -८९% आदीसह सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन आर.एस. चोपडे, उपाध्यक्षा श्रीमती एल.टी. शेंडगे, सचिव एस.ए.पाटील, खजिनदार एस. व्ही. अनुसे, समन्वय समितीचे अध्यक्ष डी. ए. वाघमोडे, कार्यवाह बी.पी. सरगर, सहकार्यवाह प्रशांत स्वामी, संचालक व प्रभारी प्राचार्य लुनेश विरकर, आदीसह सर्व सल्लागार, संचालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here