राजुरा १३ मे
श्री गुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव यांनी श्री गुरुदेव निवासी बाल सुसंस्कार शिबिराला सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर तर्फे शाल,पुष्पगुच्छ, ग्रामगीता देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सेवाधिकारी विलास गाढवे, ऋषीजी पिंपळकर, रामचंद्र कुचनकर, मारोती सातपुते यांचा सत्कार मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, राजुरा तालुका, ह.भ.प.शैलेश कावळे महाराज, अनिल चौधरी, विकास कोतपल्लीवार, लोमेश मडावी, महादेव पोटे, रामदास चौधरी, बादल बेले, छत्रपती गेडाम श्री गुरूदेव सेवा मंडळाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. गोयेगाव येथे गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत. ग्रामोन्नती, लहान मुलांना सुसंस्कार, ग्रामसफाई, सामुदायिक प्रार्थना, विवाह सोहळे करीता ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री गुरूदेव सेवा मंडळ गोयेगावं यांचा सत्कार करण्यात आला.




