राजुरा
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता प्रणित बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व यावर नामदेव मारोती आस्वले , जी.प.शाळा चिंचाळा मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी ह. भ.प.स्वामिनी गौरीताई विटोले, अनील चौधरी सहाय्यक प्रशिक्षक, मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, राजुरा, मोहन वडस्कर, बाळा गोहोकर, स्नेहल राऊत, लोमेश मडावी , दृष्टी बोलधने, योगिता धाकतोडे, अविनाश ठावरी, देविदास वांढरे, शांताबाई लांडे, शंकर थेरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अन्नदाते द्वारकाबाई पाचभाई, मोनिष नांदुरकर यांचा शाल ,पुष्पगुच्छ व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.या निवासी शिबिरात १६० मुल – मुली सहभागी झाले असुन त्यांना सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकास, आदर्श दिनचर्या, स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता इत्यादी गुणाची वाढ व्हावी याकरिता शिबिरातील अभ्यासक्रमात अध्ययनात सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता पठण ,समूह गान, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, मराठी हिंदी भजने,स्वागत गीते, ताल,स्वर, हावभाव तसेच सामान्यज्ञान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने अथक परिश्रम घेतले जात आहे.
———————————————
नामदेव मारोती आस्वले, जी. प. शाळा चींचाळा
सामुदायिक प्रार्थनेतून खरा मानव तयार करण्याचे शिक्षण प्राप्त होते. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर सामुदायिक प्रार्थनेशिवाय पर्याय नाही. आपले जीवन परमात्मामय, सेवाभावी, शिस्तप्रिय, व्यसनमुक्त व सामाजाचे कल्याण करण्यासाठीं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनात, व्यवहारात सुद्धा ग्रामगिता व सामुदायिक प्रार्थनेप्रमाणे आचरण करावे असे आवाहन आस्वले यांनी केले. श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराच्या आयोजकांचे कौतुक करीत मोठ्याप्रमाणात सहभागी झालेल्या विध्यार्थी व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले.




