ब्रम्हपुरी :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या परीक्षेत यंदाही यशाची उज्वल परंपरा कायम ठेऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.
या यशानिमित्ताने महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभात संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि विद्यार्थ्यांना पेढा भरवून तोंड गोड केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेच्या सदस्या डॉ. स्निग्धा कांबळे, सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षिका, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.




