Home गडचिरोली वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

76

कराड (दि. 24,विद्यानगर, प्रतिनिधी) – “मानवी जीवन हे धकाधकीचे व धावपळीचे होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरीपण नागरिकांनी वेळ काढून आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड, सौ वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कराड व स्वर्गीय सौ वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2फेब्रुवारी 2025ते 1फेब्रुवारी 2026) आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे अध्यक्ष व माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री मा. श्री बाळासाहेब पाटील यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल कॉलेजच्या व रुग्णालयाच्या स्टाफला शुभेच्छा दिल्या.
या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे बनलेले आहे. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर नागरिकांनी सातत्याने आरोग्याच्या तपासण्या करून घ्याव्यात कारण वयानुसार शारीरिक बदल होत असतात. यातच काही संकेत मिळतात. त्यांना गांभीर्याने घेतले पाहिजे. कारण सध्याच्या युगात जंक फूडचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. आहारात वापरले जाणारे व्हाईट पदार्थ हे अतिशय वाईट आहेत. त्यामुळे वेळीच केलेल्या तपासण्यामुळे मानवी जीवन आत्मविश्वासाने जगता येते. यासाठी अशा उपक्रमात नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या शिबिरास स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराडच्या डॉ. स्नेहा शेजवळ, डॉ. अमोल जाधव, समुपदेशक महेश शिंदे, डॉ. नवनाथ चोपडे, अंजुम नदाफ, आयेशा शेख, वैशाली दळवी, अक्षय गुरव तसेच ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर, साताराच्या डॉ.दिपाली देसाई, तुषार बरकडे निलेश सूर्यवंशी दीपक जगताप यांनी शिबिरात नागरिकांच्या रक्तगट तपासणी रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, कर्करोग तपासणी व कॅल्शियम तपासणी इत्यादी तपासन्या केल्या. याप्रसंगी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी आरोग्याच्या तपासन्या करून घेतल्या.
या शिबिरास श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला, मा. अरुण पाटील (काका )विश्वस्त, सदस्य यांनी शिबिरास भेट देऊन शिबिराचे नीटनेटके आयोजन व नियोजन केल्याबद्दल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एस. आर. सरोदे व सर्व स्टाफचे कौतुक केले. या शिबीरप्रसंगी बनवडीचे माजी सरपंच श्री शंकरबापू खापे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. आर. आर. थोरात, उपप्राचार्य आर. ए. कांबळे, पर्यवेक्षिका एस. एस. मधाळे, विध्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.डॉ. एम. ए. कदमपाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. ए. पाटील यांनी आभार मानले. प्रा. एस. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here