गंगाखेड :-
नागवंशी सेवाभावी संस्था यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.20 एप्रिल रोजी बुद्ध विहार, डॉ आंबेडकर नगर या ठिकाणी स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा वर आधारित होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होती. या स्पर्धेचे उद्घाटन मिथिलेश भैय्या केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक विशाल साळवे, राहुल गायकवाड आयोजक सुरेश साळवे, कोमल साळवे ,सुनीता घाडगे, लक्ष्मीबाई आडे, कौशल्यबाई कांबळे, शांताबाई साळवे, कमलबाई साळवे, लक्ष्मीबाई साळवे,त्रिशलाबाई साळवे,अनुराधाबाई साळवे या उपस्थित होत्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर व इतर ठिकाणांहून महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आहे .वेगवेगळ्या गटातून स्पर्धा घेऊन अंतिम गटात प्रवेश मिळून प्रथम, द्वितीय ,तृतीय येणाऱ्या महिला स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सहभागी महिलांनी आनंद व्यक्त करीत या स्पर्धेचा आनंद लुटला.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रेफ्रिजरेटर नगरसेवक राजकुमार त्र्यंबक सावंत यांच्या वतीने देण्यात आले . दुसरे पारितोषिक सुरेश साळवे यांच्या वतीने ड्रेसिंग टेबल, तिसरे पारितोषिक कोमल सुरेश साळवे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.
प्रथम क्रमांक प्रियंका गुणवंत कांबळे, द्वितीय क्रमांक सुजाता प्रवीण कांबळे, तृतीय क्रमांक भाग्यश्री संतोष हनवते यांनी पटकावला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल जगतकर ,विजयकुमार मस्के, बाळू साळवे ,गौतम सावंत, सुनील सावंत ,राहुल गायकवाड, शंकर साबळे, अतिश साळवे, बबलू साळवे, नवनाथ साळवे, विष्णू साळवे, राज साळवे,धनु साळवे ,आनंद साळवे, अतुल साबळे ,संविधान साळवे व डॉ.आंबेडकर नगर मधील मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.




