*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड /सातारा : विरळी, ता. माण. येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ झालेल्या सशस्त्र दरोड्याचा शोध अवघ्या चार तासांत म्हसवड पोलिसांनी लावून लुटलेला ५ लाख १२हजाराचा मुद्देमाल जप्त केला व सहा सराईत दरोडेखोरांना म्हसवड पोलिसांनी शिताफिने अटक केली.
या दरोड्यात दरोडे खोरांनी वापरलेली पिस्तूल, तलवारी, कोयते, वाहने आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या सहकारी पोलीस यांना मोठे यश मिळाले आहे.
या दरोड्याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडून मिळालेली
माहितीनुसार दि. २० एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या सुमारास नागेश मोहन दीडवाघ (रा. दीडवाघवाडी) हे त्यांच्या मित्र आणि सासऱ्यासोबत जेवण करून परतत असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या 6-7 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड, तलवार, कोयता आणि पिस्तूल दाखवून त्यांनी सुमारे 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल – सोन्याच्या चैन्या व रोख रक्कम लुटली. या घटनेची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 106/25 अन्वये दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे अवघ्या चार तासांत सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली सर्व वाहने आणि संपूर्ण लुट जप्त करण्यात आली.
या गुन्ह्यात अटक झालेले आरोपी
विजय बाबा शिंदे, समाधान सिदा गोरड,प्रवीण सुरेश गोरड,करण नवनाथ गोरड,विशाल महादेव नलवडे,अक्षय महादेव गोरड.
हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून याआधीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आहे.
सदर कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, सुभाष भोसले, भगवान सजगणे, नवनाथ शिरकुळे, श्रीकांत सुद्रिक, अभिजीत भादुले, सतीश जाधव, महावीर कोकरे. अधिकाऱ्यांनी पार पाडली.
अशी दबंग कारवाई केल्याबद्दल म्हसवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेली महिनभर चालू असलेले चोऱ्याचे सत्र यामुळे नागरिक भयभीत होते या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
