दौंड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानगाव ( तालुका दौंड ) शाळेचे मुख्याध्यापक शामराव जगतात तसेच दौंड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील घुमरे साहेब हे नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत असल्याने कानगाव शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच कानगावातील ग्रामस्थ व पालकांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शामराव जगताप व सुनील घुमरे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी श्री शामराव जगताप व श्री सुनील घुमरे यांच्या अनेक सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विचारातून आणि कविता, गाणी गाऊन त्यांना भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील ४ थी च्या विद्यार्थ्यांनाही निरोप देण्यात आला. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला ऑफिस खुर्ची भेट दिली. दिनांक १७ एप्रिल रोजी कानगाव शाळेच्या मैदानात त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीचकुले साहेब, नानासाहेब गवळी, ऍड आबासाहेब फडके, ऍड. पोपट गवळी, रमेश गवळी, राजेंद्र गवळी, भाऊसाहेब फडके, किरण कोऱ्हाळे, योगेश चौधरी, नानासाहेब कोऱ्हाळे, डॉ बापूराव फडके, शंकर काळे, अप्पासाहेब कोऱ्हाळे, धनंजय कोऱ्हाळे, सखाराम खोमणे, प्रकाश लकडे, विनोद साळुंके, विजय गवळी, सुधीर नराळे, विजय ठुबे, डॉ भारती फडके, संध्या कुंभार, शोभा कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ हराळ यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र जगताप यांनी केले. श्याम ठाणेदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजनाने करण्यात आली.
