Home महाराष्ट्र 25 एप्रिल रोजी यशोधरा (नाटक)चा प्रकाशन व चर्चासत्राचे आयोजन

25 एप्रिल रोजी यशोधरा (नाटक)चा प्रकाशन व चर्चासत्राचे आयोजन

126

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड: येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या हिंदी विभागा द्वारे नारायणराव जाधव येळगाकर द्वारा लिखित व प्रा.डॉ.एम.डी.इंगोले यांच्या हिंदी अनुवादीत ‘यशोधरा’ तसेच न्यू वर्ल्ड पब्लिकेशन नई दिल्ली द्वारा प्रकाशित रचनेच्या प्रकाशन व चर्चासत्राचे श्री संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक प्रा.डॉ.भीमराव खाडे (ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी) अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे श(अध्यक्ष: श्री संत जनाबाई शिक्षण संस्था गंगाखेड), कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डॉ.सुरजीत सिंह परिहार (अध्यक्ष: हिंदी अभ्यास मंडळ स्वारातीमविद्यापीठ नांदेड़) उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अड़.संतोष मुंढे (सचिव:श्री.संत जनाबाई शिक्षण संस्था), प्रसिद्ध लेखक नारायणराव जाधव येळगाकर, ‘यशोधरा’ नाटकावर चर्चा सत्रात:
प्रा.डा.सुरेश शेळके(अभिनेता दिग्दर्शक,लेखक), प्रा.डॉ.सौ.सविता किर्ते (श्रीमती सुशिलादेवी वरिष्ठ महाविद्यालय, लातूर), प्रा.डॉ.संजय जाधव(श्री शिवाजी महा.परभणी), प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे(महात्मा फुले महाविद्यालय,मुखेड), प्रा. डॉ. सोळुंके (कै.बापुसाहेब पाटिल एकंबेकर महाविद्यालय, उदगीर) उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्रा.डॉ.प्रेमानंद बनसोडे (प्रसिद्ध कवि लेखक),प्रा.डॉ.आनंद इंजेगांवकर (विद्रोही कवि लेखक) लाभणार आहेत व विचार मंथन होणार आहे.
तरी सर्व साहित्य प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहावे असे कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक श्री संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धूत यांनी आग्रहाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here