Home अमरावती बाबासाहेबांचे संविधान देशाला वाचवू शकते- प्रा.नरसिंह उजंबा परमार राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे...

बाबासाहेबांचे संविधान देशाला वाचवू शकते- प्रा.नरसिंह उजंबा परमार राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न .

118

 

 

अमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्य,समता बंधुता व न्यायाच्या विचारांची समाजाला आज गरज आहे. माननीय कांशीरामजी यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार संपूर्ण भारतभर केला. आज बाबासाहेबांचा राजकीय, सामाजिक व आर्थिक विचार स्वीकारल्यास भारत सुजलाम – सुफलाम होईल. बाबासाहेबांचे संविधानात देशाला वाचवू शकते.
असे विचार अध्यक्ष साहित्यिक प्रा.नरसिंह उजंबा परमार यांनी अध्यक्षपदावरून व्यक्त केले.

ते सर्वोदय कॉलनी, अमरावती येथील संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृह (माजी कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे सार्वजनिक वाचनालय) येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व सर्वोदय कॉलनी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून विचार व्यक्त करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.नरसिंह ऊजंबा परमार तर प्रमुख अतिथी सर्वोदय कॉलनीचे अध्यक्ष सुधाकर नाचणे, RCM चे शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले, प्रा. डॉ. संजय खडसे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेलापूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, RCM चे शहर अध्यक्ष योगेश पखाले होते.

अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थित सर्व बंधू – भगिनींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी त्यांच्या ” अभंग तरंग ” या अभंगसंग्रहातील ” भीमराव ” या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान हे संपूर्ण जगात संसदीय लोकशाहीसाठी आदर्श व सर्वश्रेष्ठ सविधान आहे. सामाजिक व आर्थिक समता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यामुळे भारतीय संविधान लोकशाहीचा प्राण आहे.”असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी प्रमुख अतिथी पदावरून व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 24 तासापैकी 18 ते 21 तास जिद्द व चिकाटीने करीत. ग्रंथासाठी घर बांधणारे बाबासाहेब जगातील एकमेव व्यक्ती असावे. वाचाल तर वाचाल हा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांसारखी अभ्यासातील जिद्द व चिकाटी अंगीकारणे आवश्यक आहे.”असे विचार प्रा.संजय खडसे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले,महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांचे तत्त्वज्ञान कृतीत जोपासणारी माणसे कधीही लाचारीने कुणासमोर नतमस्तक होत नाहीत. ही बाब सतत लक्षात ठेऊन आपण सर्वांनी बाबासाहेबांचा वारसा पुढे चालविण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन मागासवर्गीय समाजास प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हालअपेष्टा सहन करून उच्च शिक्षण प्राप्त केले.त्या शिक्षणाचा उपयोग हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाकरिता व देशहिताकरिता केला. हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी नीती व सदाचाराने वर्तन करुन सुजाण नागरिक बनावे.असे प्रतिपादन शहर अध्यक्ष योगेश पखाले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर बुंदिले यांनी तर संचालन योगेश पखाले व आभार कृष्णा मोहोकर यांनी मानले.

याप्रसंगी डॉ.गजानन तायडे, कृष्णा मोहकर, डॉ.तुषार गांवडे, गजानन पिंजरकर, विजय चापके, रामदास इंगळे, संजय डाखोडे, श्रीमती शोभाताई देऊळकर, सौ. सुनिता तायडे आदिसह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here