Home चंद्रपूर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आम्ही सुरक्षित आहोत–राजकुमार जवादे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आम्ही सुरक्षित आहोत–राजकुमार जवादे.

117

 

चंद्रपूर (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रम घेऊन या देशाला स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वावर आधारित संविधान दिले त्यामुळेच आज भारतातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्रितपणे बंधूभावाने वागत आहेत असे स्पष्ट प्रतिपादन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी केले ‌‌. ते14 एप्रिल 2025 ला वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड चंद्रपूर क्षेत्राच्या भटाडी कोळसा खुली खदान येथील कार्यालयात विवीध ट्रेड युनियनच्या कामगार संघटनांच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आपल्या प्रथम राजकीय पक्षाचे नांव स्वतंत्र मजूर पक्ष ठेवून मजूराविषयी असलेली सहानुभूती जाहीर केली एवढेच नव्हे तर 1937 ला संपन्न झालेल्या मुंबई विधानमंडळात स्वतंत्र मजूर पक्षाचे वेगवेगळ्या जाती प्रवर्गातील 15 आमदार निवडून आणले होते व हा पक्ष प्रबळ असा विरोधी पक्ष होता या वरून कामगारांच्या बलशाली शक्तिची डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव होती.परंतू आजच्या प्रस्थापितांच्या कामगार संघटना मात्र सामाजिक क्रांतीचे जनक ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपला नेता मानत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.यावेळी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे संघटन सचिव प्रा.डॉ.टी.डी.कोसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीसाठी असलेल्या योगदानाबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंचावर भटाडी कोळसा खुली खदान येथील प्रब़ंधक मोहम्मद अब्राहीम,कार्मिक प्रबंधक सुनील, कामगार कल्याण अधिकारी तसेच वेगवेगळ्या ट्रेड युनियनचे असंख्य कामगार व महीला कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगारांचे प्रतिनिधी घोनमोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय गोंडाने,अशोक सागोरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here