Home महाराष्ट्र म्हसवडला बंदुकीच्या धाकाने भरदिवसा लाखोचा ऐवज लुटला या घटनेने शहरात घबराटीचे...

म्हसवडला बंदुकीच्या धाकाने भरदिवसा लाखोचा ऐवज लुटला या घटनेने शहरात घबराटीचे वातावरण

53

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड/सातारा : म्हसवड शहरात मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भरदिवसा तीन चोरट्यांनी डॉक्टर नरेंद्र पिसे यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बंगल्यात घुसून लाखोंचा ऐवज लुटला. म्हसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दिवसाढवळ्या शशस्त्र धाडसी चोरी झाल्याने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली यांची चर्चा काही वेळातच संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती’ अशी, म्हसवड येथे सातारा पंढरपूर महामार्गालगत खरात हॉस्पिटलशेजारी डॉ. नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला आहे. मंगळवारी भरदिवसा दुपारी तीन अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात. प्रवेश केला. यावेळी नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते. त्यावेळी डॉ. पिसे यांच्या सून व लहान बाळ घरी होते. दुपारी १.४५ वाजता बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर यांच्या पत्नीला व लहान बाळाला एका रुममध्ये कोंडून ठेवले. याची जाणीव यांना होताच त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले कि तुम्ही घरी आला आहे का? त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितले मी घरी आलो नाही. त्यावेळी त्यांनी पतीला सांगितले कि घरान कोणीतरी घुसले आहे व लगेच रुमच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजाबंद केला. दरम्यान, मोबाईलवरील पती-पत्नींचे संभाषण त्या चोरट्यांनी ऐकले. चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मुख्य दरवाजा बंद होता. परंतु, चोरटे पाठीमागील दरवाजातून बाहेर आले. त्याचवेळी त्यांनी चोरट्यांच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवला व पळून गेले.या घटनेनंतर शहरात खळबल उडाली.
डॉ. पिसे यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला अनेक हॉस्पिटल, हॉटेल्स असून सुद्धा चोरट्याचा अंदाज किंवा तिथे काही घडतं आहे हे कसे कळले नाही याचे आश्चर्य वाटत आहे.
. ही माहिती समजताच म्हसवड पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचे वर्णन व गाडीचा शोध सीसीटिव्हीच्या माध्यमातून सुरू केला-घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षर सोनवणे करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here