Home महाराष्ट्र म्हसवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; फटाक्याची तुफानी आतिषबाजिसह मिरवणूक...

म्हसवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; फटाक्याची तुफानी आतिषबाजिसह मिरवणूक संम्पन्न

202

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड /सातारा : म्हसवड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रविवार, दि. १३ रोजी रात्री बारा वाजता बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर त्रिशरण, पंचशील ग्रहण करून आंबेडकरी अनुयायानी फटाक्यांच्या तुफानी आतषबाजीत 14 एप्रिल चे स्वागत करण्यात आले.
सोमवारी सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बाबासाहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. सकाळी नऊ वाजतां प्रथम धम्मध्वज फडकवून बुद्ध वंदना घेणेत आली बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करणेत आला यावेळी ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, म्हसवड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगरसेवक शहाजी लोखंडे, सनी तुपे,बंटी खाडे, संजय टाकणे, प्रशांत दोशी आदी मान्यवरानी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले.
सायं. सहा वाजतां मिरवणूकीस प्रारंभ झाला यावेळी मिरवणुकीत पारपंरीक वाद्य आटपाडीचे सुमधुर वाद्य असलेला महाराष्ट्र बँड आणि डी जे सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सिहंसनावर आरूढ असलेली भव्य मूर्ती रथात विराजमान होती त्यामागे तथागत गौतम बुद्ध यांचा सुशोभीत रथ व संविधान रथ हे या मिरवणूकीचे खास आकर्षण होते.
तरुणाई डी जे च्या तालावर थिरकत असताना ज्येष्ठ नागरिक हे सुमधुर वाद्याचा आनंद घेत होते जयभीम युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी आपले खास आकर्षण असलेलं लेझिम सादर करून जमलेल्या प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी फटाक्याची तुफानी आताशीबाजी करणेत आली
मिरवणूकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून सुरु झाली माळी गल्ली, प्राथमिक आरोग्य केंद्र, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (एस टी स्टॅन्ड ), महात्मा फुले चौक, छ. शिवाजी महाराज चौक, सिद्धनाथ चौक मार्गे अत्यन्त शिस्तबध पद्धतीने आणि शांततेत मिरवणुक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आली.
यावेळी सर्वाचे आभार मानून म्हसवड पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त पार पाडल्यामुळे वाघमोडे साहेब व त्यांच्या स्टारफचा हार व श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here