पुसद – बेलोरा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यवतमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.यानंतर मान्यवर जयंती निमित्त खंडाळा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.देविदास पाटील साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले.आश्विन तांबडे साहेब ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांचे सुद्धा मुलाचे मार्गदर्शन लाभले. यानंतर भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष हा आजचा पिढीला टिकवता आला पाहिजे आणि अन्याय अत्याचार विरुद्ध पेटून उडता आले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा असं संघर्ष करा हा मोलाचा नारा दिला त्या नाऱ्यानुसार सर्व समाजांनी त्या मार्गावर चालले पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका कोणत्या जातीचे नसून हे समस्त अन्याय अत्याचार पीडित दीनदुबळ्या चे बाबासाहेब आहेत त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात सादर करावी व सर्व धर्म समभाव मिळून प्रत्येक गाव खेड्यामध्ये ही जयंती सर्व जातीने मिळून साजरी करावी.तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ ,व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब,पोलीस अप्पर अधीक्षक पियुष जगताप साहेब,विभागीय पोलीस अधिकारी बीजे हर्षवर्धन साहेब,खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील साहेब यांना निवेदन दिले होते त्यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सहकार्य करावे
हा जयंती उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता आनंदात साजरा होईल असे शब्द त्यांनी दिले होते ते शब्द त्यांनी पाळले त्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानतो. अश्या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानतंर कार्यक्रमाची सांगता होऊन भीम आर्मी संघटनेच्या शाखा फलकाच्या अनावरण बेलोरा येथे मोठ्या उत्सवात संपन्न झाले.शाखा फलकाच्या तत्पूर्वी या सांस्कृतिक कार्यक्रमाला खंडाळा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मा.देविदास पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मा.अश्विनी तांबडे साहेब ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांचे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होते.तसेच धोंडबा पोले सरपंच बेरोला,नामदेवराव गडदे सदस्य पंचायत समिती पुसद, शरद खंदारे ग्रामपंचायत सदस्य , गिरीधर कांबळे ग्रामपंचायत सदस्य, राजकुमार भगत, भगवान कांबळे माणिक भगत दारासिंग जाधव सदस्य ग्रा.प.बेलोरा संदीप घोलप ग्रा.प.सदस्य बेलोरा,संदीप घोलप ग्रा.प.बेलोरा भूषण भोकरे, अनिल कांबळे, कैलास कांबळे, मनोज भगत, बद्रीनाथ कांबळे, सविधान कांबळे तसेच महिला मंडळी खूप मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते व गावातील सर्व नागरिक व भीम आर्मी चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे. सुभाष पठाडे यांनी …
सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन परसिक कांबळे भीम आर्मी शाखाध्यक्ष
त्यांनी केले




