Home यवतमाळ बौद्ध समाज विहारच्या जागेवर केलेले अतिक्रम तात्काळ हटवा-भीम आर्मी ची मागणी

बौद्ध समाज विहारच्या जागेवर केलेले अतिक्रम तात्काळ हटवा-भीम आर्मी ची मागणी

86

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- कुंभारी येथील ग्रामपंचायत येथे नोंद असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव व कुंभारी येथील सर्व बांधव व गावकरी यांच्या कडून उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले.
कुंभारी येथील दलीत वस्ती अंतर्गत समाज मंदिर अतिक्रम करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.या सर्व जागेचा ताबा हा समाज मंदिराच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालय कुंभारी येथे नोंद आहे. या जागेवर आमदार निधी मधून 30 लक्ष निधी त्या जागेवर समाज मंदिर उभारणीसाठी आमदार निधी मधून देण्यात आलेला आहे
तसेच समाज मंदिराच्या नावाने नमुना ८ ग्रामपंचायत कार्यालय कुंभारी पं. स. पुसद जि. यवतमाळ असिसमेन्ट नक्कल सुद्धा आहे. त्या जागेचा मालमत्ता क्र.८९६ हा आहे. जागेचे एकूण शेत्रफळ ६० बाय २५ – १५०० फूट येवढे असून ज्या जागेवर सर्व समाजाचे समाज प्रबोधन, सांस्कृतिक, शैक्षणिकव गोर गरीब समाज बांधवाचे विवाह सुद्धा होतात. या जागेचा संपूर्ण ताबा हा ग्रामपंचायत कार्यालय नोंदीनुसार समाज मंदिर यांच्या कडे असून सुद्धा. गावातील सवाइराम पवार( वय.७२ वर्ष )रा. कुभारी याने समाज मंदिर च्या जागेवर अतिक्रमण करून तिथे टीनाचे शेड उभारले असून आता त्या जागेवर पक्के सिमेंट चे घर बांधत असून त्याने तसे रेती,मुरूम तिथे आणून टाकले असून त्याला त्या जागेवर बांधकाम करण्यास कुंभारी येथील गावकऱ्यांनी विरोध केला असता तो ऐकण्याचे मनस्तीत नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 तारखेला त्या ठिकाणी साजरी करण्याची आहे तरी त्या जागेवर केलेले अतिक्रम तात्काळ काढून ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यासाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावी अतिक्रमधारकावर कायदेशीर कारवाई करून तेथील अतिक्रमण काढण्यात यावे.कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव आनंदात साजरा करण्यात अडथळा निर्माण करत असून अतिक्रम धारकावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी. पुढील उद्भवलेल्या परिस्थितीस संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल . या गंभीर प्रकरणाचे निवेदन उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.

निवेदन देते वेळेस भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ भालेराव कुंभारी येथील सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here