Home यवतमाळ फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे “पदवीदान सोहळा” उत्साहात साजरा

फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे “पदवीदान सोहळा” उत्साहात साजरा

209

 

पुसद प्रतिनिधी
दि.9/04/2025 रोजी फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद येथे सत्र 2023-24 चा “पदवीदान सोहळा” संपन्न झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशानुसार दरवर्षी हा पदवीदान सोहळा महाविद्यालयात संपन्न होत असतो. त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा पदवीदान सोहळा फार उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रल्हाद वावरे सर हे होते तर सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डाॅ. एम. बी. कदम सर( प्राचार्य,गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय, उमरखेड ) तसेच मराठी विभागप्रमुख प्रा. अभय जोशीसर हे द उपस्थित होते. प्राचार्य डाॅ. कदम सरांनी विद्यार्थांना “नव्या काळाची पावलं ओळखुन आपला विकास करवून घ्यावा” असे आवाहन केले.
विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. संजय भोयर, प्रा. डाॅ. उल्हास चव्हाण, प्रा. डाॅ. दत्ता पवार, प्रा. अभय जोशी, प्रा. महेश हंबर्डे, प्रा. डाॅ. अनिल दुधे, तसेच उत्कृष्ट संचालन करणारी बी. एस्सी. फायनलची विद्यार्थीनी कु. सपना हिंगमीरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून एकमेव मायनर प्रोजेक्ट शांसन झालेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. संजय भोयर सर यांचा पाहूण्यांच्या हस्ते शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांमधील 183 पैकी जवळजवळ 100 विद्यार्थी पदवी ग्रहन करण्यासाठी सभागृहात उपस्थित होते. पदवीदान सोहळ्याचे समन्वयक प्रा. डाॅ. अनिल दुधे व त्यांचे सहकारी यांनी अत्यंत सुयोग्य नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. महाविद्यालयातील तिन्ही शाखेचे वरिष्ठ प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते. मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना पदवीदान केल्या गेले. विद्यार्थांचे कौतूक करून भावी जीवनासाठी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here