महिलांनी पुढाकार घेत केले होते या महामोर्चाचे आयोजन
उमरखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
उमरखेड(दि.2एप्रिल):-सकाळी ११ वाजता बिहार येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मण महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी तसेच बी. टी. एम. सी. ऍक्ट 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ चेतन महिला मंडळ समस्त शिव फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात “महाबोधी विहार मुक्त करा” “होश में आवो बिहार सरकार” ” बीटी एम सी एक्ट रद्द करा”, अशा घोषणा बाजी करत अनेकांचे लक्ष वेधणारा महा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून भदंत खेमधम्मो महाथेरो तसेच अनेक बौद्ध भिक्खू बौद्ध उपासक, उपासिका, नवयुवक, तरुण तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले. या कार्यक्रमाचे संचालन जयशील कांबळे तसेच अत्तदिप धुळे यांनी केले.
मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड पासून झाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत यशस्वी रित्या धडक मारली, जिथे या मागणीसंबंधी सखोल चर्चा व कारवाईची मागणी केली गेली. यामध्ये बौद्ध भिक्कुनी आपले मनोगत व्यक्त करत बौद्ध समाजाने आपली एकता आणि शक्ती दाखवून, महाबोधी महाविहार मुक्ती करण्याच्या संदर्भात योग्य ते पाऊल न उचलल्यास यापेक्षाही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा दिला आहे.
यामुळे या मागणीला अधिक सामर्थ्य मिळालं असून, येणाऱ्या दिवसांत सरकारला एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.