रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हापुरी(दि.2एप्रिल):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील मराठी मराठी विभाग प्रमुख डॉ. जगदीश मेश्राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक महामंडळ नागपूर येथे आयोजित अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कार विचारक मा. डॉ.राजेश गायकवाड, सदस्य ,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,मुंबई मा. डॉ .जगन कराडे, समाजशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मा.डॉ. विद्याधर बनसोड, सुप्रसिद्ध साहित्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कुमार खोब्रागडे जागतिक आंबेडकरांचे साहित्य महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांचे मित्रपरिवार व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.




