आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा चा माजी विद्यार्थी प्रशांत भोयर.l
विद्यार्थांची प्रगती हिच आपल्या कार्याची खरी पावती – बादल बेले
राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुर(दि.31मार्च):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक ( PSI) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत जवाहर नगर राजुरा येथील प्रशांत शशिकलाताई विजय भोयर यांनी बाजी मारली आहे. दि. 25/03/2025 रोजी जाहीर झालेल्या निकालात प्रशांतची पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवड झाली आहे. प्रशांत हा अतिशय सामान्य घरचा मुलगा असून त्याचे वडील ट्रक चालक आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल राजुरा येथे झाले.श्री . शिवाजी महाविद्यालय राजुरा येथून विज्ञानाची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण चालू असताना प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. याचवेळी त्यांना आतिश धोटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशांतच्या या यशाबद्दल बादल बेले, सुवर्णा बेले यांनी शॉल, श्रीफळ ,वृक्ष कुंडी व भारताचे संविधान हे पुस्तकं भेट देऊन अभिनंदन केले.
प्रशांतचे मूळ गाव जयरामपूर ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली होय. प्रशांतचे वडील विजय भोयर यांची त्यावेळी भारतीय सैन्यात निवड झाली होती. पण घरच्या विरोधामुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. आणि त्याच वेळी त्यांनी आपले गाव सोडून चंद्रपूर गाठले. सुरवातीला ट्रकवर क्लिनरची नोकरी केली आणि नंतर चालक. आपलं स्वप्न पूर्ण नाही झाले तरी त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा चंग बांधला. मोठा मुलगा ललितकुमार याची सैन्यात निवड झाली. प्रशांतला मोठ्या भावाचा आधार झाला. पुणे गाठून जमून अभ्यासाला सुरवात केली. पहिले दोन प्रयत्न अवघ्या 1 ते 2 गुणांनी गेले. तरी प्रशांतने हार मानली नाही. आणि तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक PSI हे पद मिळविले . प्रशांतने हे यश जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना प्रेरणादायी आहे.
प्रशांतच्या वडिलाचे आज स्वप्न पूर्ण झाले .प्रशांत आपल्या यशाचे श्रेय आईवडील, मोठा भाऊ ललितकुमार आणि आतिश धोटे सराना देतो. प्रशांतच्या या यशाबद्दल आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, ज्योती कल्लुरवार, रोशनी कांबळे, रूपेश चिडे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, वैशाली टिपले, किसन वेडमे, प्राजक्ता साळवे, रजनी पिदुरकर व राजुरा परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
