Home महाराष्ट्र जयसिंग वाघ ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ ने...

जयसिंग वाघ ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ ने सन्मानित

163

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.30मार्च):- येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा निर्भिड वक्त्ये जयसिंग वाघ यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपूर तर्फे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ दिनांक ३० मार्च रोजी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन (मधुरम) सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले .

            या प्रसंगी वाघ यांना बुके , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर ( त्रिपुरा ) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य , संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे होते . आर्यवृत्त आंतराराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुरा चे कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर , नाटककार डॉ. सुनील रामटेके , डॉ. विजय शेगोकार विशेष कार्य अधिकारी , मंत्रालय , मुंबई डॉ. विद्याधर बनसोडे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

         या प्रसंगी ‘ दीक्षा भूमी ऊर्जा भूमी ‘ हे नाटक , ‘ उजळली धम्मज्योत भीम स्वरांची ‘ हा गीत गायन कार्यक्रम , ऊर्जागीत अश्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मोठ्यासंख्येने हजर होते .

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळबांडे, प्रास्ताविक डॉ. भूपेश पाटील , आभारप्रदर्शन डॉ. विलास तायडे यांनी केले . यशस्वीतेसाठी वासुदेव वले , शबाना तडवी , डॉ. किरण चव्हाण , प्रज्ञा मून , विशाल पिकलमुंडे , सुरेश गजभिये यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here