Home चंद्रपूर स्थळ चित्रपटाचे युवा दिग्दर्शक जयंत सोमलकर यांचा मिराज चित्रपट गृहात सत्कार 

स्थळ चित्रपटाचे युवा दिग्दर्शक जयंत सोमलकर यांचा मिराज चित्रपट गृहात सत्कार 

130

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21मार्च):-सध्या सर्वत्र स्थळ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. विदर्भातील विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांनी सादर केलेला व शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित स्थळ चित्रपट सध्या रसिक वर्ग बघत आहे. 

    या चित्रपटाची निर्मिती , दिग्दर्शन लक्षात घेता युवा दिग्दर्शक जयंत सोमलकर यांचा सत्कार धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर ,राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेतर्फे मिराज सभागृहात करण्यात आला. यावेळी संपूर्ण चित्रपट शो आरक्षित केला गेला होता .

      सदर सत्कार समाज मंदिराचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते व केंद्रीय समितीचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धनोजे कुणबी समाज मंदिराचे सचिव अतुल देऊळकर, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, अँड. विलास मानकर, प्रा. अनिल डहाके, माजी अध्यक्ष अण्णाजी जोगी, गणपत हिंगाणे, वासुदेव बोबडे, डॉ. विजय हेलवटे, डॉ . शिवम सातपुते याशिवाय २५० समाजबांधव उपस्थित होते

   यावेळी प्रास्ताविकात प्रा. नामदेव मोरे म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुलीचे लग्न जुळविणे व जुळले तरी लग्न करणे, ही आता साधी गोष्ट राहिलेली नाही. हुंडा मुळे शेतकरी बापाला अनेक अडचणीला पुढे जावे लागते. आर्थिक अडचणीमुळे तो निराश होऊन आत्महत्येकडे वळतो, अशा शेतकऱ्यांची कर्म कहाणी सांगणारा स्थळ चित्रपट असल्याचे सांगितले. प्रतिक्रियेत बंडोपंत बोढेकर यांनी स्थळ चित्रपट हा ग्रामीण बोलीभाषा व ग्रामीण संस्कृतीचे वास्तव दर्शन घडविणारा आहे असल्याचे मत व्यक्त केले. तर अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी स्थळ चित्रपटाचे चित्रीकरण डोंगरगाव(रेल्वे) येथील असून दिग्दर्शक सुद्धा त्याच मातीत जन्मलेला आहे. त्यामुळे स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणे, हे आपले कर्तव्य आहे. या चित्रपटाने आपल्या समाज व्यवस्थेतील विषय मांडून समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्यामुळे हा चित्रपट आपल्यासोबत इतरांनीही बघावा, हाच आमचा हेतू असल्याचे मत मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here