सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.16मार्च):- म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील जांभुळणी, ता. माण, जि. सातारा येथील भोजलिंग ढाब्यावर जेवन करीत असताना ओळखीच्याच चौघांनी राहुल राजु तुपे, व भोजलिंग महादेव तुपे रा. पानवण यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन जखमी केल्याच्या कारणावरुन तुपे यांनी म्हसवड पोलीसांत चौघांविरोधात अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी दि. १४ रोजी सायं 7=30 च्या दरम्यान धुळवड असल्याने पानवण येथील राहुल राजु तुपे हे जांभुळणी येथील भोजलिंग ढाब्यावर जेवन करण्यासाठी गेले होते, त्याठिकाणी ते जेवन करीत असताना त्यांच्याच ओळखीचे विजय छबु चव्हाण, व अनिल लक्ष्मण चव्हाण या सह त्यांचे दोन साथीदार त्याठिकाणी आले, त्यावेळी राहुल तुपे व अनिल चव्हाण यांच्यामध्ये किरकोळ वाद झाल्याने वरील चौघांनी संगनमत करुन भोजलिंग तुपे व मला मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली व गंभीर जखमी केल्याची फिर्याद भोजलिंग तुपे यांनी म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली असुन सदर ची फिर्याद म्हसवड पोलीसांत दाखल होताच उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत स.पो.नि. अक्षय सोनवणे यांना कारवाईच्या सुचना दिल्या.
स.पो.नि. सोनवणे यांनी वरील चौघांनाही ताब्यात घेत त्यांना वडुज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार ही जणांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असुन अधिक तपास स.पो.नि. सोनवणे करीत आहेत.




